-->
कापूस,सोयाबीन,कांदा या पिकांचे बाजारभाव वाढणार ?

कापूस,सोयाबीन,कांदा या पिकांचे बाजारभाव वाढणार ?

 या खरीप हंगामात(2022) सुरवातीलाच चांगला पाऊस झाला.वेळवर पिक पेरण्या झाल्या.कापूस लागवडी झाल्या.वेळेवर पाऊस झाल्यामुळे एकंदरीत शेतकरी खुश झाला.पिकाला खते,औषधे वेळेवर देण्यात आले.देशातील अनेक राज्यात सुरवातीलाच पुरपरिस्थिती निर्माण झाली.तसेच महाराष्ट्रात सूद्धा विदर्भ,मराठवाडा,नाशिक भागात अती पाऊस झाला यामुळे सुरवातीलाच काही पिकांचे नुकसान झाले होते.इतर भागात सर्वसामान्य पाऊस झाला.

नंतर महाराष्ट्रात जवळपास एक महिना पाऊसाने विश्रांती घेतली.सोयाबीन फूलोर्यात आली पण दिर्घ काळ पाऊसाने विश्रांती दिल्यामुळे काही सोयाबीनची फूलगळ झाली,परिणामी शेंगा कमी लागल्या.तसेच कापूस पिकाची वाढ काही कालावधीसाठी खुंटली.पाणी द्यावे अन पाऊस आला तर काय ?असा प्रश्न शेतकर्यांसमोर ऊभा राहीला.

एकूणच पाऊसाच्या भरोशावर सोयाबीन आणि कापूस पिकाला पाणी देण्यात गेले नाही.एक महिना ऊघडीप देलेल्या पाऊसाने पुन्हा जोर धरला आणि शेतमालाचे भरने झाले म्हणजेच पाण्याची गरज भागली.आणि पिकं पुन्हा बहरली.शेतकरी खूश झाला.

सोयाबीन सोंगनीला आली,कापूस वेचणीला आला पण पाऊसाने पुन्हा जोर धरला.अशाही अवस्थेत जेंव्हा पाऊस ऊघडेल,त्या-त्या वेळेस शेतकर्यांनी सोयाबीन काढनी केली,काहींनी कापूस वेचनीला सुरवात केली.या काळात पिकाचा दर्जा चांगला निघाला.नंतर आॅक्टोबर महिना चालू झाला आणि पाऊसाने हाहाकार केला.रोज किंवा 2-3 दिवसाला पाऊस आणि तोही भरपूर प्रमाणात पडला.

काही शेतकर्यांच्या सोंगलेल्या सोयाबीन पाऊसामुळे अक्षरशा वाहुन गेल्या.ज्यांनी सोयाबीन झाकून ठेवली,अशा सोयाबीनखाली पाणी वाहीले गेले.कापूस पिकाची बोंडे पाण्यामुळे आणि अपुर्या प्रकाशामुळे काळी पडली,खराब झाली.एकूणच पिकाचा दर्जा ढासळला गेला.

खराब कापूस बोंडे 

या दोन्ही पिकांचे जवळपास 30ते 40टक्के नुकसान झाले. पिकाचा दर्जा ढासाळल्यामुळे बाजारभाव कमी झाले.अतिवृष्टीमुळे पिक ऊत्पादन कमी निघणार हे सांगायला कोणत्याही जोतीशाची गरच नाही.हेच गणीत कांदा पिकाला सूद्धा लागू होते.चाळीतील कांदा(ऊन्हाळी) मोठ्या प्रमाणात खराब झाला.सुरवातीलाच अती पाऊसामुळे खरीप कांदा रोपे एक ते दीड महिना ऊशीरा पडली.काही रोपं अती पाऊसामुळे नष्ट झाली.पुर्वी,ज्या भागात अत्यल्प पाऊस होत असे,अशा दुष्काळी भागात शेतकर्यांचे महत्वाचे पिक लाल कांदा असायचे.परंतु अशा भागात मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत आहे.

लाल कांदा लागवड 

त्यामुळे अशा भागात पिक हंगाम सुद्धा बदललेला आहे.म्हणजेच अशा अती पाऊसाचा विचार केला,तर आता लाल कांदा फक्त पुर्ण मुरमाट जमिनीत,डोंगराळ भागातच येऊ शकतो.आता रांगडा कांद्याचा विचार केला, तर हा कांदा कोणत्याही जमिनीत घेता येतो.पण यासाठी आधी आॅगष्ट-सप्टेंबर मध्ये कांदा रोप टाकावे लागेल पण अती पाऊसामुळे रोपे टाकू शकत नाही.म्हणून हा कांदा सूद्धा डोंगराळ भागातील शेतकर्यांच्या वाट्याला गेलाय. 

एकूणच गणीत असं होतंय की लाल कांदा आणि रांगडा कांदा हे दोन हंगामातील पिक आहे आणि क्षेत्र मर्यादित असल्यामुळे,कांदा चांगलाच भाव खाणार हे निश्चित आहे.तसेच कापूस आणि सोयाबीनची घटती ऊत्पादकता बघता  पुढील काळात या दोन्ही पिकांना जास्त दर मिळेल असंच वाटतंय.पण पिक नुकसानीमुळे शेतकर्यांना तोटा होणार हे निश्चित.एव्हढे सारे नुकसानीचे दृष्य बघून शेतकरी तोटा सहन करतोय आणि स्वत:ची समजूत घालतोय की,

बित गई सो बित गई, तकदिर का शिकवा कोण करें. जो तीर कमानसे निकल गया ऊस तीर का पिछा कोंण करें.

0 Response to "कापूस,सोयाबीन,कांदा या पिकांचे बाजारभाव वाढणार ?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel