-->
ब्राम्हणी: ग्रीण-अप फार्मर प्रोड्युसर कंपनीची यशस्वी वाटचाल

ब्राम्हणी: ग्रीण-अप फार्मर प्रोड्युसर कंपनीची यशस्वी वाटचाल

Greenup farmer producer company Bramhani : आज ता.२०/७/२०२३ रोजी ब्राम्हणी गावात ग्रीण-अप फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये नवीन व्यवसाय भुमी-पुजनाचा कार्यक्रम पार पडला.यामध्ये सोयाबीन प्रक्रिया उद्योग,नवीन गोडाऊन बांधकाम आणि पशुखाद्य निर्मिती या व्यवसायांचा समावेश होता.तसेच या प्रसंगी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांनी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

ग्रीण-अप कंपनी 

अहमदनगर जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ साहेब,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशीष येरेकर साहेब,महाराष्ट्र राज्य आत्मा संचालक श्री दशरथ तांभाळे साहेब,जिल्हा कृषी अधिकारी श्री सुधाकर बोराळे साहेब,जिल्हा नोडल अधिकारी श्री राजाराम गायकवाड साहेब,कृषी आयुक्तालय संचालक श्री सुभाष नागरे साहेब,आत्मा प्रकल्प संचालक श्री विलास नलगे साहेब,राहुरी तालुका कृषी अधिकारी श्री अशोक गिरगुने अशा प्रकारे प्रत्येक विभागातील अधिकारी वर्ग या कार्यक्रमात उपस्थित होते.तसेच विद्यमान आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मातोश्री सौ.उषाताई यानीही हजेरी लावली.


अहमदनगर जिल्हाधिकारी 

या कार्यक्रम स्थळी शेतकर्यांसाठी  प्रदर्शन महोत्सव आयोजित करण्यात आला.यामध्ये बॅंक,सरकारी योजना,प्रक्रिया उद्योग,सेंद्रिय खते-औषधे,धांन्य-बाजार अशा प्रकारच्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी,शेतकर्यांना  महत्त्वपुर्ण माहिती दिली.जिल्हाअधिकारी यांच्यासह सर्व मांन्यवरांनी प्रदर्शन-स्थळी प्रत्येक स्टॉल धारकांना भेट दिली.

राजस कंपोस्ट खत स्टॉल 

हा कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ,वांबोरी मंडल अधिकारी विनया बनसोडे मॅडम,कृषी सहाय्यक युगप्रिया उगले मॅडम यांनी परिश्रम घेतले.शेवटी ग्रीण-अपचे संस्थापक सचीनभाऊ ठुबे यांनी कंपनीच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्व मान्यवर,स्टॉल धारक,कंपनी सभासद आणि सर्व शेतकर्यांचे आभार मानले


0 Response to "ब्राम्हणी: ग्रीण-अप फार्मर प्रोड्युसर कंपनीची यशस्वी वाटचाल "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel