-->
राजस कंपोस्ट वापरण्याची पद्धत ?

राजस कंपोस्ट वापरण्याची पद्धत ?

 जिवाणुयुक्त राजस कंपोस्ट खत:

राजस,हे एक कंपोस्ट खत आहे.कुजलेल्या सेंद्रिय पदार्थाला कंपोस्ट म्हणतात.प्रत्येक पदार्थाची कुजण्याची वेळ मर्यादा वेग-वेगळी असते.असे कंपोस्ट शेतात टाकल्यानंतर,मातीला ताकद मिळते आणि हिच ताकद पिकांना पहिलवान बनवते.अशा पहिलवान,म्हणजेच सशक्त पिकावर कोणतिही रोग-किड हल्ला करत नाही.म्हणून पिक रोगराईला बळी पडत नाही आणि उत्पादन वाढते.

प्रत्येक पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्यांची गरज असते.कंपोस्टमध्ये सर्व प्रकारची अन्नद्रव्य ऊपलब्ध असतात.मग तरीही पिकांना रासायनिक खतांची गरज का असते?कारण कंपोस्टमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण अल्प असते आणि प्रत्येक पिकांना NPK या अन्नद्रव्यांची जास्त गरज असते.अशी NPK अन्नद्रव्य  रासायनिक खतामध्ये जास्त असतात.मग पिकांना कंपोस्ट का वापरावे,असा प्रश्न उपस्थित होतो.याचे उत्तर असे येईल की, कंपोस्ट एक ताकद असते.ही ताकद (घटक)मातीमध्ये नसेल तर कोणतीही रासायनिक खते पुर्ण क्षमतेने पिकांना ऊपयोगी येणार नाही.पिकांना अन्नद्रव्य मिळण्यासाठी कुजलेल्या सेंद्रिय घटकांचीच गरज असते.

राजस कंपोस्ट पिकाला कसे द्यावे?आपला ऊद्देश काय आहे? यावरुन पुढील मार्ग वापरता येईल.👇🏼

१) राजस कंपोस्टमध्ये वेगवेगळे जिवाणू असतात,त्यामुळे या खताचा डोस पिकांना स्वतंत्र करावा.म्हणजेच,सेंद्रिय घटक प्लस जैविक घटक असे दोन्ही घटक मातीमध्ये कामी येईल.जैविक खते पिकांना देतांना जमिनीत ओल असने आवश्यक आहे.याचे प्रमाण एकरी ४ते ५बॅग राहील.

२) रासायनिक खतांची(NPK) कार्यक्षमता वाढविण्यासाठी,या खतांमध्ये १ते२बँग राजस कंपोस्ट मिसळावे.असे केल्यास रासायनिक खताभौती सेंद्रिय पदार्थाचे आवरण तयार होते.असे आवरण तयार झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक घटक एकत्रित येत नाही आणि याचा तिसराच घटक तयार होऊन, जमिनीत स्थिर रुपात जात नाही.म्हणजेच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.

३) अनेक शेतकरी आपल्या पिकांना दुय्यम अन्नद्रव्य (कँल्शियम,मँग्नेशियम,सल्फर) पिकांना रासायनिक(NPK) खतामध्ये देतात.NPK खतांच्या दाण्यांचा आकार मोठा असतो आणि यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य मिक्स केली जातात,असे केल्याने दुय्यम अन्नद्रव्य बारीक असल्यामुळे घमेल्यात (खत टाकण्याचे साधन) तळाशी जातात त्यामुळे मिक्स केलेली खते सर्वत्र समप्रमाणात पिकांना पडत नाही.हीच क्रिया सुक्ष्म अन्नद्रव्य (झिंक,फेरस, इतर)यांच्या बाबतीत घडते,म्हणून अशा खतांमध्ये एकरी १ते२बॅग वापराव्या.अजून एक कारण म्हणजे रासायनिक NPK आणि दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्य सरळ एकत्रित केले तर याचा तिसराच घटक तयार होऊ शकतो,आपण याला खते स्थिर रुपात गेली असे म्हणतो,जे पिकांना ऊपयोगी येत नाही.म्हणून कोणतीही दुय्यम किंवा सुक्ष्म अन्नद्रव्य,पिकांना देतांना कंपोस्टमधूनच द्यावी.

४) आपल्या शेतातील मातीची गुणवत्ता प्रयोगशाळेत तपासली तर आपल्या लक्षात येईल की,मातीचा सेंद्रिय कर्ब (सुपीकता)खूपच कमी झालेला आहे,त्यामुळे राजस कंपोस्ट खत एकरी ८ते १० बॅग आपल्या पिकांना द्यायलाच हव्यात,राजस कंपोस्ट मध्ये १८/टक्के पर्यंत सेंद्रिय कर्ब असतो.


अशा चार प्रकारे राजस कंपोस्ट खत पिकांना देता येते.


जैविक राजस कंपोस्ट खत विक्री चालू आहे.

अधिक माहितीसाठी:

संपर्क -९८९०९२०५३६

ब्राम्हणी ता. राहुरी 

0 Response to "राजस कंपोस्ट वापरण्याची पद्धत ?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel