-->
ब्राम्हणी:विज-बिल वसूलीचा अखेर तोडगा निघाला

ब्राम्हणी:विज-बिल वसूलीचा अखेर तोडगा निघाला

ब्राम्हणी:आज ब्राम्हणी गावात,सक्तीच्या विज-वसुली विरोधात,महावितरनचे अधिकारी आणि शेतकर्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली.शेतकर्यांच्या हक्कासाठी आणि विजे-संबंधित होणार्या गैरसोयीबद्दल,आज ब्राम्हणी गावात अहमदनगर शिवसेना जिल्हाध्यक्ष राऊसाहेब नाना खेवरे आले होते,यांच्याबरोबर सचीन म्हसे,हमीद पटेल,पोपट शिरसाठ,विजय शिरसाठ,दिपक पंडीत हे सर्व ऊपस्थित होते.तसेच ब्राम्हणी गावातील शिवसेना गटप्रमुख श्री प्रशांत शिंदे,शेतकरी नेते श्री विठ्ठल मोकाटे गुरूजी,माजी  ऊपसरपंच श्री रंगनाथ मोकाटे,श्री भानुदास मोकाटे,पत्रकार श्री गणेश हापसे यांनी शेतकर्यांचे प्रतिनिधित्व केले.

ब्राम्हणी गावात,महावितरनचे अधिकारी गांगुर्डे साहेब यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले.तुम्ही शेतकर्यांना कोणतीही पुर्व-सूचना न देता,शेतीची विज बंद का केली?विज बंद करण्याचे शासनाचे परिपत्रक आहे का? असे इतर अनेक प्रश्न खेवरे नाना यांनी अधिकार्यांना विचारले.यावर कोणतेही ऊत्तर महावितरनच्या अधिकार्यांकडे नव्हते.यावेळी प्रशांत शिंदे,मोकाटे गुरुजी,रंगनाथ मोकाटे,भानुआप्पा मोकाटे या सर्वांनी शेतकर्यांच्या समस्या,अधिकार्यांसमोर मांडल्या.

महावितरणच्या अधिकार्यांना,खेवरे नाना यांनी काही सूचना केल्या.त्या अशा की कोणतीही पुर्व-सूचना न देता,विज खंडीत करू नका.विज वसूल करा पण शेतकर्यांना वेळ द्या. शेतकरी अडचणीत आहे,त्यामुळे विज बील प्रमाणात घ्या.3 ची मोटर असेल तर 2300 रु आणि 5 ची मोटर असेल तर 4100 रुपये घ्या.यावर महावितरनच्या अधिकार्यांनी सकारात्मकता दर्शवली.यावेळी ब्राम्हणी गावातील संतोष तारडे,शेखर मोकाटे,रमेश वने,संदीप हापसे, नंदकुमार बानकर,दिगंबर राजदेव, सलीम शेख यांच्यासह अनेक शेतकरी ऊपस्थित होते. 

शेवटी चर्चेत असे ठरले की येत्या 2 दिवसात शेतकरी आणि महावितरनचे अधिकारी यांच्यात बैठक होईल आणि वरीलप्रमाणे निर्णय घेतले जाईल.आता विजबील भरणा करण्यासाठी किती दिवसाची मुदत दिली जाईल,हे बैठकीत कळेल.

0 Response to "ब्राम्हणी:विज-बिल वसूलीचा अखेर तोडगा निघाला "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel