-->
ब्राम्हणी गावात प्रथमच,सरपण विक्री केंद्र चालू

ब्राम्हणी गावात प्रथमच,सरपण विक्री केंद्र चालू

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी हे गाव राजकीय आणि व्यावसायीक दृष्ट्या प्रगत मानले जाते.व्यावसायीक विचार केला,तर कोरोना काळानंतर या गावात व्यावसायीक क्षेत्रात खूप मोठी स्पर्धा चालू झाली.गावातील ग्रामपंचायतने बांधलेल्या गाळ्यांचे लिलाव 9 ते 10 लाख रुपयांपर्यंत गेले.अशा छोट्याशा गावात एवढी मोठी बोली इतिहासात पहिल्यांदाच ब्राम्हणीकरांना बघायला मिळाली.आता येथे अनेक छोटे-मोठे व्यवसाय चालू झालेले आहेत.काही व्यवसाय रिमेक झालेत,तर काही नवीन झालेत.

असेच,ब्राम्हणी गावात एक 'सरपण'विक्री केंद्र नव्यानेच चालू झाले आहे.गावातील जय हिंद गृप सामाजीक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने पोपटराव मोकाटे यांनी हे 'सरपण विक्री केंद्र' चालू केलेले आहे.हे सरपण फक्त अंत्यविधीसाठी विक्री केले जाईल.

मागील काळात ब्राम्हणी आणि परिसरातील केंदळ,राजळे-वाडी,मोकोळओहळ,चेडगाव अशा वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना अंत्यविधीसाठी लागणारे सरपण आणायला,सोनई किंवा वांबोरी या गावात जावे लागत असे.आता गरजेवंतांची ही गरज ब्राम्हणी गावातच पूर्ण होणार आहे.

प्रत्येक वस्तू आणि सेवा गरजेची असते आणि त्या सर्वत्र ऊपलब्ध असतात;पण महत्वाचं हे आहे की,ती वस्तू किंवा सेवा ग्राहकांना लवकारात-लवकर ऊपलब्ध झाल्या पाहिजे.याच हेतूने पोपटराव मोकाटे यांनी ब्राम्हणी येथील जयहिंद गृप एक सामाजीक प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने, गरजेवंतांना अंत्यविधीसाठी लागणारे वाळलेले सरपण,ब्राम्हणी गावात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.विक्री केंद्रावर सरपन,बांबू,शिडी या गरजेच्या वस्तू ऊपलब्ध असणार आहे,असे पोपटराव मोकाटे यांनी सांगितले.


ठीकाण: ब्राम्हणी-खळवाडी

संपर्क-9623904010

0 Response to "ब्राम्हणी गावात प्रथमच,सरपण विक्री केंद्र चालू "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel