-->
गुंतवणूक,सेंद्रिय खतांची आणि जीवाणूंची

गुंतवणूक,सेंद्रिय खतांची आणि जीवाणूंची

गुंतवणूक हा शब्द जादूप्रमाणे आहे.कारण, गुंतवणूक माणसाला आश्चर्यकारक परिणाम दाखवून देत असते.मग ते परिणाम चांगले असो अथवा वाईट असो.योग्य गोष्टींची गुंतवणूक,योग्य ठिकाणी केली तर जीवणात इच्छीत परिणाम मिळतात,मग ती गुंतवणूक कशाचीही असू शकते.ज्ञानाचा आणि वेळेचा वापर करुन प्रत्येकजण आपले भवितव्य घडवत असतो.प्रत्येकाला रोज 24 तास वेळ वापरायचा असतो.म्हणजेच सर्वांना सारखाच वेळ वापरायला मिळतो. ज्ञान सर्वांचे सारखे नसते.पण आनंदाची बातमी म्हणजे प्रत्येकजण आपले ज्ञान वाढवू शकतो.ज्ञान अनेक प्रकारचे असते आणि प्रत्येक ज्ञानाची काहीना-काही विशिष्ट किंमत असते.किंमत म्हणजे,तुम्ही वर्तमानात ज्या स्थितीत आहात ती स्थिती तुमच्या ज्ञानामुळेच असते.जर ही स्थिती बदलायची असेल,तर तुम्हाला ज्ञान वाढवून त्याचे कृतीमध्ये रुपांतर करावे लागेल. 

येथे शेती क्षेत्राचा विचार केला तर येथेही गुंतवणूक असते.वेळ आणि ज्ञान या दोन प्रमुख गुंतवणूकी येथे महत्वाच्या असतात.या क्षेत्रातील ज्ञान प्रत्येकाला, ज्याच्या-त्याच्या क्षमतेनुसार पैसा मिळवून देत असते.म्हणजेच काय,तर प्रत्येकाच्या ज्ञानाची किंमत पैसा,संपत्तीच्या रुपात ठरलेली असते.ज्ञानाचा ऊपयोग फक्त पैसा कमवण्यासाठीच केला जातो असं नाही,तर शिक्षण,तंत्रज्ञान,कला,भाषण,राजकारण,समाजकारण अशा अनेक क्षेत्रात केला जातो.पण येथे आपण शेतकर्यांच्या आर्थिक विषयावर बोलत आहोत,म्हणून ज्ञान,वेळ आणि पैसा हे तीन विषय येथे महत्वाचे आहेत.

शेतीमध्ये दरवर्षी चांगले पिक ऊत्पादन घ्यायचे असेल,तर आपल्याला शेतीमध्ये सेंद्रिय घटकांची गुंतवणूक करावीच लागेल.तरच आपली शेती,आपल्याला आर्थिक परतावा जास्त देईल.ज्या प्रमाणे मानवी शरीर जीवंत ठेवण्यासाठी,शरिरात आत्मा(जीव) गरजेचा असतो,अगदी त्याचप्रमाणे माती जीवंत ठेवण्यासाठी सूक्ष्म जीवाणू महत्वाचेअसतात आणि सूक्ष्म जीवाणू जीवंत ठेवण्यासाठी सेंद्रिय घटकांची आवश्यकता असते.या सेंद्रिय घटकांपासून सेंद्रिय कर्बाची निर्मिती होते.याला काहीजण ह्युमस म्हणतात,जो पिक-पोषणासाठी महत्वाचा असतो.निकस माती,म्हणजेच कस नसलेल्या मातीत कितीही रासायनिक खते टाकली,तरी ही खते पिकांना पुर्ण क्षमतेने मिळत नाही.दुसरी बाजू म्हणजे,सुपीक मातीमध्ये थोडीशी रासायनिक खते टाकली,तरी ही खते पिकांच्या मुळांद्वारे पुर्ण क्षमतेने शोषली जातात. म्हणून आपल्याला,आपल्या शेतात सेंद्रिय खतांची गुंतवणूक करावी लागेल.

महागाईमुळे शेतकर्यांना शेतीवर खर्च करणे कठीण झाले आहे.अशा आर्थिक कारणामुळे,ज्या शेतकर्यांना शेतीमध्ये शेनखत,लेंडीखत,मळी,हिरवळीचे खत अशा प्रकारच्या सेंद्रिय खतांवर जास्तीचा खर्च करणे शक्य नाही,अशा शेतकर्यांनी आपल्या पिकांना,शेनखतापासून प्रक्रिया केलेले राजस कंपोष्ट खत एकरी 10 ते 12 बॅग वापराव्या.यामुळे माती सुपीक होण्यास मदत होईल आणि मातीमध्ये जिवाणूंची संख्या वाढेल.तसेच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल.


जीवाणू-युक्त राजस कंपोष्ट खत विक्री चालू आहे 


अधिक माहितीसाठी संपर्क करा 9890920536

Santosh Tarde

0 Response to "गुंतवणूक,सेंद्रिय खतांची आणि जीवाणूंची"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel